MSEB HCL Group Mediclaim Insurance Policy Circular 2024-25 : सन २०२४-२५ या कालावधीकरिता मुळ राशीभूत विमा रक्कम रु. ५ लाख व Compulsory Increased Sum Insured रु.५ लाख अशी एकूण रु.१० लाखांपर्यंत कार्यान्वित करण्याकरिता मा. व्यवस्थापकीय संचालक, म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी मर्यादित तथा अपर मुख्य सचिव (ऊर्जा), महाराष्ट्र राज्य यांनी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, महानिर्मिती व महापारेषण तसेच चारही कंपन्यांचे संचालक (वित्त) व संचालक (मासं), महावितरण, महापारेषण तसेच कार्यकारी संचालक (मासं), महानिर्मिती व कार्यकारी संचालक (वित्त), महावितरण यांच्याशी विचारविनिमय करुन मंजूरी दिलेली आहे.
राज्यातील या कर्मचाऱ्यांना Mediclaim Insurance Policy लागू
सदर योजना म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी मर्या. व महावितरण कंपनीमध्ये दि.०१ ऑक्टोबर २०२४ रोजी सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबित असणाऱ्या कुटुंबातील जास्तीत जास्त ०५ सदस्यांसाठी मुद्दा क्र.३.१ मधील कुटुंबाच्या व्याख्येनुसार लागू राहील. तसेच, या कंपन्यांमधील सर्व संचालक, प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी आणि महावितरण कंपनीमधील पदवी प्रशिक्षण अभियंता (GET), पदविका प्रशिक्षण अभियंता (DET), लेखा सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / (मासं), उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक व वीजसेवक अशा विहीत पध्दतीने नियुक्त झालेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी आणि सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता लागू असणार आहे.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंजूर उपलब्ध पदांवर समायोजन - शासन शुद्धीपत्रक
‘या’ दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
विमा रक्कमेचे संरक्षण रु. १० लाखांपर्यत मिळणार
सदर योजनेतंर्गत वैद्यकीय विमा संरक्षण हे कर्मचारी व त्याच्यावर अवलंबित असणाऱ्या कुटुंबातील परिपत्रकात नमूद कुटुंबाच्या व्याख्येतील सदस्यांपैकी कर्मचाऱ्याने निर्देशीत केलेल्या कोणत्याही ०५ सदस्यांसाठी मूळ राशीभूत विमा रक्कम रु. ०५ लाखांपर्यत राहील. तसेच रु. ०५ लाखांपुढील रु. ०५ लाखांकरिताचा Compulsory Increased Sum Insured अशा प्रकारे एकूण विमा रक्कमेचे संरक्षण रु. १० लाखांपर्यतचे राहील.
Mediclaim Insurance Policy (MSEB HCL Group ) : २०२४-२५ ची ठळक वैशिष्ट्ये : येथे पाहा
भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्याबाबचे 'नवीन' शासन परिपत्रक
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; आजार व हॉस्पिटल यादी पहा
‘सक्षम ॲप’ ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान -जाणून घ्या मिळणाऱ्या सुविधा
सरकारी नोकरीची चांगली संधी सोडू नका, जाहिरात येथे पाहा
विविध पदांसाठी सरळसेवा भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक