मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच

Voter List : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती कळविलेली असून ती खालीलप्रमाणे आहे.

voter list

  • लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील एकूण मतदार 9 कोटी 29 लाख 43 हजार 890 होते. 
  • 20 ऑक्टोबरपर्यंत 36 लाख 31 हजार 279 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे 
  • 20 ऑक्टोबर रोजी एकूण 9 कोटी 65 लाख 5 हजार 958 मतदार आहेत. 
  • लोकसभा निवडणुकीनंतर, 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SSR-2024) प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर, 
  • वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी उपलब्ध होता आणि या दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली.

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी नियमानुसार योग्य प्रक्रिया अवलंबली आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1950, मतदार नोंदणी नियम, 1960 आणि भारत निवडणूक आयोगाच्या 11 ऑगस्ट 2023 च्या पत्रातही मतदार यादीबाबत तरतुदी नमूद केल्या आहेत. 

या तरतुदींनुसार, फॉर्म क्रमांक 6 सादर करून मतदार यादीतील नाव नोंदले जाऊ शकते आणि फॉर्म क्रमांक 7 सादर करून वगळले जाऊ शकते. फॉर्म क्रमांक 8 सादर करून मतदाराच्या नोंदीमध्ये कोणताही बदल (नाव, पत्ता, बदलणे इ.) करता येईल आणि हे सर्व फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. दावे आणि हरकतींसाठी सात दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहे. आक्षेपांचा योग्य विचार केल्यानंतर, मतदार नोंदणी आधिकारी योग्य ते निर्णय घेतात. महाराष्ट्र राज्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांबाबतची खालील आकडेवारी स्वयं-स्पष्ट आहे. 

मतदार यादीत नाव चेक करा

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

समाज कल्याण विभागात मोठी भरती, जाहिरात पाहा

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now