राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.
अशा वेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील.
विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहका-यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे.
या बाबींचा विचार करता सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या काळात वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळासंदर्भात, शालेय शिक्षण विभागाचे नवे निर्देश जारी
शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांनी तातडीच्या काळात विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा देण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
गुड न्यूज! आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी
- शाळेमध्ये प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.
- शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार तातडीने प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी First aid/sick room याकरीता खोली उपलब्ध असावी.
- शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या (First Aid Kit) ठेवाव्यात. ४. शाळेतील विद्यार्थी / कर्मचाऱ्यांकरीता दरवर्षी कमीत कमी एक वैद्यकीय प्रथमोपचार प्रशिक्षण व वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात यावे.
- सदर शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोश्वास (Artificial Respiration), कृत्रिम वायुजिवन (CPR- Cardiopulmonary Resuscitation) व इतर तातडीचे प्रथमोपचार देणेबाबत त्यांना प्रशिक्षिण देण्यात यावे.
- शाळेच्या नजीक उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालये, शासकीय आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रूग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावेत व त्यांचेशी समन्वय ठेवण्यात यावा.
- आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत.
- आपत्कालीन परिस्थितीत सदर समन्वयकांने रुग्णास तात्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयांशी संपर्क साधावा व आजारी विद्यार्थ्यास रुग्णालयात भरती करण्यात मदत करावी,
- शाळेने नजीकच्या दवाखान्यांशी तसेच जवळपासच्या डॉक्टरांशी On-call सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार करावेत व विद्यार्थ्यांना गरजेनुसार डॉक्टर On-call सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
- आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहनाची व्यवस्था असावी.
- विद्यार्थ्यांकरीता शाळास्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची (Counsellor) व्यवस्था करण्यात यावी.
असे दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयात सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
NMMS शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज सविस्तर तपशील पाहा
टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक - TET Hall Ticket Download Click Here
MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी आणि 8 वी) 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा