राज्यातील कोतवालांच्या संदर्भात नुकताच सरकारने मानधन वाढ आणि अनुकंपा धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, आशातच आता कोतवालांना सणानिमित्त देण्यात येणारे सण अग्रिम वाढविण्याबाबत शासन निर्णय दिनांक 8 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
सणानिमित्त देण्यांत येणाऱ्या संण अग्रिमाच्या रकमेत वाढ
शासनाने आता असे आदेश दिले आहे की, राज्यातील कोतवालांना महत्वाच्या सणानिमित्त देण्यांत येणाऱ्या संण अग्रिमाच्या रकमेत वाढ करुन रुपये २०००/- (अक्षरी दोन हजार फक्त) या ऐवजी रुपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार फक्त) इतके सण अग्रिम प्रत्येक कोतवालास देण्यात यावे. सदर सण अग्रिमाची रक्कम दहा समान हप्त्यात त्यांना देय मानधनातून वळती करुन घेण्यात यावी. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
मानधन वाढ आणि अनुकंपा धोरण लागू शासन निर्णय पाहा
अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा
राज्यातील या सणांना कर्मचाऱ्यांना सण अग्रिम
सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांना राज्यातील कर्मचाऱ्यांना सण अग्रिम दिला जातो. यामध्ये दिवाळी, रोश - होशना, रमझान ईद, वैशाखी पोर्णिमा (भगवान बुध्द जयंती), ख्रिसमस, स्वातंत्र्य दिन, पारसी नववर्ष, प्रजासत्ताक दिन, संवत्सरी, डॉ. आंबेडकर जयंती सणांना पूर्वी घेतलेले सण अग्रिम वसूल केल्यानंतरच पुढील सण अग्रिम मंजूर करण्यात येतो.
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा
राज्यातील पोलीस पाटलांच्या संदर्भात महत्वाची अपडेट
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील भरतीचा शासन निर्णय निघाला