Pre-Higher Primary Scholarship Examination (Std. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (Std. 8th) 9 February - 2025
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र सुरू झाले आहेत.
महत्वाची अपडेट! 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना जारी
शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सदर शिष्यवृत्ती परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : येथे भेट द्या
राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भात अपडेट पाहा
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी
पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना किती मिळते शिष्यवृत्ती?
इयत्ता 5 वी तसेच 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा योजनेतील Scholarship रकमेत गतवर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक 3 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार शासन निर्णय जारी केलेला आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
- उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5 वी करीता 500 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 5000 रुपये, तर माध्यमिक शाळा इयत्ता 8 वी करीता 750 रुपये प्रति माह प्रमाणे वार्षिक 7500 रुपये करण्यात आली आहे.
- शिष्यवृत्तीचे सुधारीत दर हे सन 2023 24 पासून लागू राहणार आहे.
- उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. [शासन निर्णय]