जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित
पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय आहे अगर दि.२६. सप्टेंबर, २०२३ च्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून देय आहे, याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून मार्गदर्शनाकरीता पत्रव्यवहार प्राप्त होत आहे. त्यानुषंगाने सदरहू पदांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने त्याकरीता शासनावर येणा-या आर्थिक भाराबाबतची माहिती आवश्यक आहे. यासाठी संबंधित जिल्हा परिषदांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
तथापि, ब-याच जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम ११ (१) (अ) अन्वये पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास येत आहे. तरी ज्या जिल्हा परिषद कार्यालयांकडून यापूर्वीच वेतनवाढ लागू केली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत विवरणपत्रामध्ये तात्काळ शुक्रवार दि.१८.१०.२०२४ पर्यंत शासनास सादर करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय येथे पाहा
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा
मानधन वाढ आणि अनुकंपा धोरण लागू शासन निर्णय पाहा
अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा