Pesa Bharati:अनुसूचित क्षेत्रात (पेसा) ग्राम पातळीवर काम करणाऱ्या १७ संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणूका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) भरतीमधील रिक्त पदे 'या' उमेदवारांमधून भरणार, शासन निर्णय जारी
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गामध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहायक, शिक्षक, आरोग्य सेवक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक या संवर्गांचा आहे. या संवर्गातील अंदाजित ६९३१ रिक्त पदांच्या पदभरतीसाठीची भरती प्रक्रिया मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
माझी लाडकी बहीण लेटेस्ट अपडेट पाहा
मात्र आता सदर पदे ही अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील भरती प्रक्रियेतील गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणूका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत.
मानधन तत्वावर देण्यात येणाऱ्या नेमणूका या मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या आधीन राहून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. (अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा )
आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा
11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी भरती जाहिरात पाहा