राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय दि.३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. आता यामधील निकषात सुधारणा करण्यात आली आहे.
फक्त 'या' महिलांनाच मिळणार मोफत 3 सिलिंडर; सरकारची आदेशामध्ये सुधारणा
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसंदर्भातील समक्रमांक दि.३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. २ (ब) (xiii) खालीलप्रमाणे आहे.:-
“दि.०१. जुलै, २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल." त्याऐवजी खालील प्रमाणे वाचण्यात यावा.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी, दि.०१ जुलै, २०२४ पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅसजोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅसजोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील."
मूळ शासन निर्णय दि.३०.०७.२०२४ मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुध्दीपत्रक दि.०४.०९.२०२४ मधील सुधारित तरतुदी कायम राहतील. (शासन आदेश)
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना - दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा
आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा
11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी भरती जाहिरात पाहा