मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 5 महिन्यांचा लाभ वितरीत; लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra : छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत "मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान" सोहळा संपन्न झाला. 

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार

majhi ladki bahin yojana maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना दिला.

लाडकी बहीण योजनेचा ५ महिन्यांचा लाभ वितरीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ५ महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात आला असून २ कोटी २२ लाख महिलांपर्यंत लाभ पोचला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभही लवकरच जमा होईल.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पाच महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात यश आले आहे. २ कोटी २२ लाख महिलांपर्यंत हा लाभ पोचला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभही लवकरच जमा होईल. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात १० हजार रिक्षा देण्यात येत आहेत. महानगर क्षेत्रात ५०० ते १ हजार रिक्षा देण्यात येत आहेत. पुढे हेच उदिष्ट २  हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. राज्यात एकही घटक लाभापासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी करण्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनिस ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात प्रत्येकी ₹५,००० रुपये आणि ₹३,००० रुपये वाढ करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळात माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा योग्य सन्मान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा

राज्यातील 11 हजार 556 अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात शासन निर्णय पाहा

पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट,  खा. डॉ. भागवत कराड,  आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे,  आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, उर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा,  पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now