HSC SSC Board Exam Form 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी व १२ वी) फेब्रुवारी-मार्च-एप्रिल २०२५ च्या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत. इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर ते 14 नोव्हेबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज त्यांच्या शाळा प्रमुख व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
NMMS शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज सविस्तर तपशील पाहा
हे अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाहीत
व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाचे आहेत. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाइल मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठवावी, असेही या अनुषंगाने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
इयत्ता १० वी - प्रसिद्ध पत्रक पाहा
इयत्ता १२ वी - प्रसिद्ध पत्रक पाहा
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.mahahsscboard.in/
शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी आणि 8 वी) 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा
MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी भरती जाहिरात पाहा