मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि.३.७.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निदेशानुसार, अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सचिव समितीची गुरुवार, दि.२९.८.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार बैठकीत समितीने केलेल्या शिफारशीनुसार व मा. मंत्रिमंडळाने दि.३०.९.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दोन महत्वाचे निर्णय घेतले असून, याबाबतचे शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ
राज्यातील एकूण १२७९३ कोतवालांना यापूर्वी दि.६.४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सध्या लागू असलेल्या दरमहा रु.१५,०००/- इतक्या मानधनामध्ये १० टक्के इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर दर ३ वर्षांनी दि. १ एप्रिलपासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये १० टक्के इतकी वाढ देण्यासही दिनांक 7 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत '3' महत्वाचे निर्णय
कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू
कोतवाल कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रूग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्याच्या कुटुंबाबर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीत त्याच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल पदावरील नियुक्तीसाठी असलेल्या अर्हतेनुसार अनुकंपा तत्वावर कोतवाल पदावर नियुक्ती देणेबाबत मान्यता देण्यात आली आहे.
कोतवाल मानधन वाढ शासन निर्णय पाहा
कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण शासन निर्णय
पोलीस पाटलांच्या मानधनाचा शासन निर्णय
माझी लाडकी बहीण लेटेस्ट अपडेट पाहा
आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा
11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी