Mahavitaran Employee Salery Increase : राज्यातील महावितरण कंपनी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये (बेसिकमध्ये) १९% वाढ करणेबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून, या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या किमान वेतनामध्ये दि.०१ एप्रिल २०२४ पासून मात्र मूळ वेतनामध्ये (बेसिकमध्ये) १९% वाढ करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे.
राज्यातील महावितरण कंपनी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 19 % भरघोस वाढ
मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण यांनी संचालक (वित्त) व संचालक (मासं) यांच्याशी विचारविनिमय करुन कंपनीमधील कंत्राटदारामार्फत कार्यरत बाहयस्त्रोत कंत्राटी कामगारांना सद्यस्थितीत लागू असलेल्या किमान वेतनामध्ये दि. ०१ एप्रिल २०२४ पासून मात्र मूळ वेतनामध्ये (बेसिकमध्ये) १९% वाढ करण्यास मंजूरी दिलेली आहे. मात्र विद्यमान पूरक भत्त्याच्या रक्कमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारामार्फत बाहयस्त्रोत कंत्राटीपध्दतीने कार्यरत कामगारांच्या मूळ वेतनामध्ये दि. ०१ एप्रिल २०२४ रोजीपासून १९% इतकी वाढ केल्यास परिमंडळनिहाय मूळ वेतन खालीलप्रमाणे असणार आहे.
राज्यातील सर्व संबंधित कार्यालयांना निर्देशित करण्यात आले आहे की, आपल्या अखत्यारित कंत्राटदारामार्फत बाहयस्त्रोत कंत्राटीपध्दतीने कार्यरत कामगारांना दि. ०१ एप्रिल २०२४ पासून वरीलप्रमाणे मात्र मूळ वेतनामधे वाढ माहे ऑक्टोबर २०२४ च्या मासिक वेतनापासून लागू करण्यात यावी. माहे एप्रिल २०२४ ते माहे सप्टेंबर २०२४ या कालावधीमधील देय रक्कम माहे ऑक्टोबर २०२४ मध्ये कंत्राटदारामार्फत अदा करण्यात यावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भात अपडेट पाहा
मतदार यादीत तुमचं नाव येथे पहा, नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 डाउनलोड करा
सदरचे परिपत्रक महावितरण कंपनीच्या Employee Portal वरील Circular (I.R. Department) येथे उपलब्ध असून त्यांची मुद्रांकित प्रत प्रसारीत करण्यात येणार नाही. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन व अन्य प्रश्नाबाबत शासन निर्णय निर्गमित
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भत्ता - येथे पाहा
विशेष शिक्षक पदनिर्मिती आणि समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित
‘त्या’ 1058 उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार!