Contractual Employees : समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबतचा शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश
समग्र शिक्षा (SSA) या योजनेअंतर्गत कार्यरत करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. २२.७.२०२४ रोजी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये मा. मुख्यमंत्री मदोदयांनी या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेले होते.
समितीची प्रशासकीय कारणास्तव पुर्नरचना
त्यानुसार दि. २२/०८/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली होती. आता सदर समितीची प्रशासकीय कारणास्तव पुर्नरचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सदर समितीने या करार कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत समायोजन व अन्य प्रश्नाबाबत अन्य राज्यांमध्ये या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मानधन व अन्य सेवाशर्ती याबाबत अभ्यास करून शासनास एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील सविस्तर निर्णय येथे पाहा
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ विजेत्या शाळांची यादी पाहा