मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (लाडका भाऊ) योजनेत नियुक्त प्रशिक्षणार्थ्यांना 'या' महिन्याचे विद्यावेतन वितरित

Chief Minister Youth Work Training Scheme : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत (दि ९ ऑक्टोबर) पर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या 'या' महिन्याचे विद्यावेतन वितरित

Chief Minister Youth Work Training Scheme

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यात रुजू होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना मासिक विद्यावेतनाचा पहिला हफ्ता आज अदा करण्यात आला आहे.  

प्रातिनिधिक स्वरूपात दि ९ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात सहा प्रशिक्षणार्थींना मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते विद्यावतेन अदा करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदिप डांगे, उपायुक्त डी. डी. पवार, अतिरिक्त आयुक्त अनिल सोनावणे उपस्थित होते.

एक लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थींना नियुक्ती

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, एकूण तीन लाख ६९ हजार ७९८ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली असून, एक लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले असून, १०,५८६ आस्थापनांनी याकरिता नोंदणी केली आहे. अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासन प्रयत्न्‍ाशील असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीतील वरील निर्णय सविस्तरपणे येथे पाहा

तसेच, १४६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले असून, उर्वरित २७१ संस्थांना नावे देण्यासाठी सूचना मागविण्यात येत आहेत. तसेच या संस्थांमध्ये संविधान मंदिर प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे आणि युवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सर्व प्रलंबित बाबींचा निपटारा जलदगतीने करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

योजनेची सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्ज येथे करा

फक्त 'या' महिलांनाच मिळणार मोफत 3 सिलिंडर; सरकारची आदेशामध्ये सुधारणा

आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी येथे नोंदणी करता येणार

बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करु शकतील, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असूनही बेरोजगार उमेदवारांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त होण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजना सुरु केली.

मोठी संधी! 'समाज कल्याण विभाग' अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

योजनेद्वारे राज्यातील युवकांना उद्योजकांकडे ऑन जॉब ट्रेनिंग देऊन रोजगारक्षम करण्यात येईल. उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या योजनेकरिता राज्य सरकारकडून ५५०० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

दहावी आणि बारावी परीक्षांचे ऑनलाईन अर्ज सुरू

आरोग्य विभाग भरतीचा निकाल येथे पाहा

11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी भरती जाहिरात पाहा

नोकरीची संधी! निरीक्षक पदांच्या 178 जागांसाठी भरती

शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना - शासन परिपत्रक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now