Maharashtra Cabinet Decision : दि. 4 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 30 हून अधिक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 3 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत '3' महत्वाचे निर्णय
1) सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-20) व त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच दंतशल्यचिकीत्सक गट- ब (एस-20) व दंतशल्यचिकीत्सक विशेषज्ञ संवर्ग (एस-23) यांना 7 व्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2019 पासून ३५ टक्के दराने व्यवसायरोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ विविध वेतनश्रेणीतील ५२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे.
राज्यातील 11 हजार 556 अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात शासन निर्णय पाहा
2) कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
पुण्यातील डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या तीनही अभिमत विद्यापीठातील २०१६ नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदांना देखील दोन लाभांचीच (१२ व २४ वर्षे) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू राहील.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय!
3) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पात्र शिक्षकेतर अधिकारी व कर्माचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या विद्यापीठातील २४ संवर्गातील २२७ शिक्षकेतर पदांना या योजनेत लाभ मिळणार आहे. वित्त विभागाच्या १ एप्रिल २०१०, ५ जुलै २०१० आणि ६ सप्टेंबर २०१४च्या शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने तरतुदी लागू होतील.
या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय येथे पाहा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय!
राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांठी महत्वाची अपडेट
आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी