केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2024-25 च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ऑक्टोंबर, 2024 या महिनाचा मोबदला रु.8272.31 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
गुड न्यूज! आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ३२८६७.९९ लक्ष व सन २०२४-२५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रु.८५४०८.४६ लक्ष असे एकुण रु.११८२७६.४५ लक्ष इतकी तरतूद राज्यशासनाने अर्थसंकल्पीत केलेली आहे.
सदर मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ऑक्टोंबर २०२४ या १ महिन्याच्या कालावधीची रु.८२७२.३१ लक्ष इतकी रक्कम लेखाशिर्ष २२१०१०१५ मधून वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मानधनात वाढीव मोबदला देण्याचा निर्णय
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ५८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो.
कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत, सुधारित शासन निर्णय
अंगणवाडी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज येथे करा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार भत्ता
तथापि, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना दिनांक १७ जुलै, २०२०, ०९ सप्टेंबर, २०२१ व दि.१० एप्रिल, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, दिनांक १४/०३/२०२४ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मानधनात अनुक्रमे रु.५०००/- व रु.१०००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ३२८६७.९९ लक्ष व सन २०२४-२५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रु.८५४०८.४६ लक्ष असे एकुण रु.११८२७६.४५ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून सदर तरतूदीमधून माहे ऑक्टोंबर २०२४ या १ महिन्यासाठीचे रु.८२७२.३१ लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या वाढीव मोबदला - शासन निर्णय पाहा
महिला व बालविकास विभागात मोठी भरती, जाहिरात पाहा
राज्यातील गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा निर्णय येथे पाहा
टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक - TET Hall Ticket Download Click Here
MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक