YCMOU Bed Admission 2024-25 : बीएड (विशेष शिक्षण) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, महितीपुस्तिका, पात्रता, ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक

YCMOU Bed (Spl) Admission 2024-25 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक (नॅक नामांकित 'अ' श्रेणी) या विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील बीएड (विशेष शिक्षण) या कोर्सचे प्रवेश सुरू झाले असून, दिनांक 11 सप्टेंबर 2024 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

बीएड (विशेष शिक्षण) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

YCMOU Bed Admission 2024-25

RCI भारतीय पुनर्वास परिषद मान्यताप्राप्त बी.एड. (विशेष शिक्षण) शिक्षणक्रम (दूरस्थ) (B.Ed.Spl.Ed.) P21 (श्रवणबाधित HI, दृष्टीबाधित VI, बौद्धिक अक्षमता ID) या प्रवर्गातील प्रवेश प्रक्रिया 2024-27 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

महाराष्ट्रात बीएड (विशेष शिक्षण) शिक्षणक्रमाची केंद्र कोठे आहे?

विशेष शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी यशवंतराव - चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बी.एड. विशेष शिक्षण ह्या शिक्षणक्रमातील श्रवणबाधित HI, दृष्टीबाधित VI, बौद्धिक अक्षमता ID या प्रवर्गासाठी महाराष्ट्रभर शिक्षणशास्त्र विद्याशाखा अंतर्गत दिव्यांग अध्ययन केंद्र प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. 

बीएड (विशेष शिक्षण) ह्या शिक्षणक्रमाची केंद्रे पुणे (HI), गडहिंगलज (HI), नंदूरबार (VI) आणि नाशिक (HI, ID,VI) या ठिकाणी आहेत.

सामान्य व विशेष शिक्षण (समकक्ष) Ded Bed समकक्ष कोर्ट निकाल व शासन निर्णय परिपत्रक 

बीएड (विशेष शिक्षण) प्रवेश पात्रतेच्या अटी

  1. यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवीस किमान ४९.५० टक्के गुण अनिवार्य किंवा इंजिनीअरिंग / टेक्नॉलॉजीतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहे.
  2. राखीव प्रवर्गासाठी वरील दोन्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये ५ टक्के गुण सवलत देण्यात येईल.
  3. जागांचे आरक्षण शासकीय नियमाप्रमाणे राहील

प्रवेश-अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 11 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना - शासन परिपत्रक

बीएड (विशेष शिक्षण) महत्वाच्या लिंक

लाडका भाऊ योजनेत 1.10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड; जुलै आणि ऑगस्टचे पैसे या तारखेला जमा होणार

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now