TET Exam 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी होणार, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक

TET Exam 2024 : महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२४" चे आयोजन दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार

tet exam 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.

शिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET Exam) ऑनलाईन अर्ज सुरू, डायरेक्ट लिंक

Teacher Eligibility Test

सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

शासन सेवेत नियमित होण्यासाठी परीक्षा बंधनकारक? शिक्षण विभागाचा मोठा खुलासा

लाडकी बहीण योजना 'सुपरहिट

कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक । Teacher Eligibility Test Time Table

  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४
  • प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे : २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ : १०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
  • शिक्षक पात्रता चाचणी पेपर II तारीख आणि वेळ : १०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM

Teacher Eligibility Test - ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक

Teacher Eligibility Test या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट : https://mahatet.in/

‘मुख्यमंत्री योजनादूत’ अंतर्गत तब्बल 50 हजार उमेदवारांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरू - डायरेक्ट लिंक

राज्यातील हे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश येथे पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now