State Teacher Award Announced : राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर, प्रवर्गनिहाय 109 शिक्षक ठरले शिक्षक पुरस्काराचे मानकरी

State Teacher Award Announced : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

पुरस्कारासाठी प्रवर्गनिहाय 109 शिक्षक ठरले शिक्षक पुरस्काराचे मानकरी

State Teacher Award Announced

पुरस्कारासाठी प्रवर्गनिहाय प्राथमिक- ३८, माध्यमिक- ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)- १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)- २, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक- १, स्काऊट/गाईड (१+१)-२ अशा एकूण १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (१) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला सन (२०२२-२३) चा एक पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील या 02 शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ जाहीर

लाडकी बहीण’ योजनेसाठी मुदतवाढ! ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यानुसार राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर शिक्षकांची निवड केली आहे.

लाडका भाऊ योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार, लगेच करून घ्या हे काम

शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना - शासन परिपत्रक

मोठा निर्णय! मुलींना लखपती करणारी लेक लाडकी योजना राज्यात लागू

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now