ST Strike Latest Update : राज्यातील गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून, एस टी महामंडळाच्या कर्मचारी कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे, मात्र आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महत्वाची अपडेट दिली आहे.
गुड न्यूज! कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
कामगार संघटनांच्या कृती समितीला निमंत्रण - सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व इतर महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी एस.टी. महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. या कृती समितीने ३ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. मात्र आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने महत्वाची माहिती दिली आहे.
गुड न्यूज! कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांना केलेल्या नम्र विनंतीनुसार दि. ४/०९/२०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीस बोलावले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत बैठकीचे आयोजन
अखेर! थकीत मानधनाचा तो शासन निर्णय निर्गमित
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय पाहा
तरी, महामंडळाच्या कर्मचारी बंधू-भगिनींनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने केले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट पाहा
लाडका भाऊ योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट
त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ४ सप्टेंबर रोजी सविस्तर चर्चा करून एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का? याकडे एस टी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काय आहेत मागण्या?
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे,
- घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ
- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे,
- 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देणे,
- मागील करारातील त्रुटी दूर करणे,
- याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल,
- मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे