सुवर्णसंधी! मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी सुरु, डायरेक्ट लिंक

Sarathi Skill Development Training Program : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि MSME टेक्नॉलॉजी  सेंटर – इंडो जर्मन टूल रूम (IGTR), अंतर्गत देण्यात येणा-या  कौशल्य विकास  प्रशिक्षणासाठी पुढील तुकडीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा,  डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

Sarathi Skill Development Training Program

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या दहावी / बारावी / आयटीआय / डिप्लोमा / डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

Sarathi Skill Development Training Program
Sarathi Skill Development Training Program

इच्छुक उमेदवारांनी येथे नोंदणी करा

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी सारथी संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in  या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच, जाहिरात व प्रवेश प्रक्रियेसाठी IGTR या संस्थेच्या www.igtr-aur.org या संकेतस्थळावर भेट देवून आपला प्रवेश निश्चित करावा.

नोंदणीसाठी : डायरेक्ट लिंक

‘मुख्यमंत्री योजनादूत’ अंतर्गत तब्बल 50 हजार उमेदवारांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरू - डायरेक्ट लिंक

लाडका भाऊ योजनेत 1.10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड; जुलै आणि ऑगस्टचे पैसे या तारखेला जमा होणार

राज्य सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट येथे पाहा

दीड लाख ते सहा लाखापर्यंत वार्षिक वेतनाच्या नोकऱ्या

सारथी  व  IGTR अतंर्गत  छत्रपती संभाजीनगर या राज्य व केंद्र शासनाच्या नामांकित संस्थेमधील सामंजस्य कराराअंतर्गत (MOU) मागील एक वर्षात मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या 741 युवक युवतींना विविध प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रवेश देण्यात आला आहे. त्यापैकी 389 प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले असून 171 उमेदवारांना राज्यातील विविध शहरात वेगवेगळ्या नामांकित खाजगी उद्योगात रोजगार मिळवून देण्यात आला आहे. या प्रशिक्षणार्थींना रुपये दीड लाख ते सहा लाखापर्यंत वार्षिक वेतनाच्या  नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.

 नामांकित उद्योग समूहामध्ये रोजगाराच्या संधी

उर्वरित 352 प्रशिक्षणार्थी सद्यपरिस्थितीत प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व प्रशिक्षणार्थींना पुणे येथील नामांकित उद्योग समूह, जय हिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, लिअर कार्पोरेशन, डिझाईन टेक, निल सॉफ्ट तसेच बंगलोर येथील टाटा फ्लेक्सि व औरंगाबाद येथील सिमेंस लिमिटेड, मान एनर्जी सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंडूरंस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, बडवे इंजीनियरिंग लिमिटेड, व्हेरॉक इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड, धूत ट्रान्समिशन, IGTR अशा नामांकित उद्योग समूहामध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या असून बरेच उद्योग समूह उरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देण्यास उत्सुक असल्याचे प्रसिद्धीपत्रात नमूद आहे.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now