अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, भाषा संचालनालय, मुंबई यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मानधन थेट 10 हजारावरून 50000 करण्याचा निर्णय! एक विशेष बाब म्हणून मंजूरी; शासन निर्णय
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचे मानधन दरमहा रु.१०,०००/- वरुन दरमहा रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) इतके तसेच अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, भाषा संचालनालय, मुंबई यांचे मानधन दरमहा रु. ७५००/- वरुन दरमहा रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) इतके वाढवून देण्यास "एक विशेष बाब" म्हणून मंजूरी देण्यात आली आहे.
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ येथे निर्णय पाहा
आरोग्य विभाग कुशल व अकुशल कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जारी
दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर साठी सविस्तर तपशील पाहा
मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ ही शासकीय कार्यालये असुन सदर कार्यालयाच्या संबंधित अध्यक्षांचे मानधन एकसमान असणे आवश्यक आहे. याअनुषंगाने वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला असता. मा.उपमुख्यमंत्री तथा मा. मंत्री (वित्त) यांनी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती यांना दरमहा द्यावयाच्या मानधनात सुधारणा करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यानुसार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे.
माझी लाडकी बहीण योजना - अंगणवाडी सेविका व मदतनीस