अखेर! पोलीस पाटलांच्या मानधनाचा 'तो' शासन निर्णय निर्गमित

Police Patil Salary GR : राज्यातील पोलीस पाटिलांच्या गेल्या ४ महिन्यांच्या मानधानाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देर्वेद्र फडणवीस यांनी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या पोलीस पाटील संघाच्या ८ व्या अधिवेशनात बोलताना दिली होती, त्यानुसार दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

थकीत मानधन वितरित करण्यास शासन मान्यता

Police Patil Salary

Police Patil Salary : राज्यातील पोलीस पाटील यांचे माहे, मे-२०२४ ते माहे, ऑगस्ट-२०२४ या चार महिन्यांच्या कालावधीकरीता रु.१३४.५१ कोटी इतका निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)

सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्ष करण्याबाबत सकारात्मक निर्णय

पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age) ६० वरून ६५ व्हावे ही मागणी योग्य असल्याचे सांगून याबाबत मुख्यमंत्री व संबंधितांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस पाटील संघाच्या   अधिवेशनात दिली आहे.

मोठी बातमी! राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत बैठक संपन्न - बैठकीतील निर्णय येथे पाहा

तसेच पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीनंतर मानधन देण्याबाबत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे उपचार मिळण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पोलीस पाटलांचा पोलीस विभाग व महसुली अधिकाऱ्यांकडून अपमान होणार नाही त्यांना सन्मान मिळेल अशी कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय पाहा

लाडका भाऊ योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now