मोठी बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ 4 हजार रुपयांची वाढ, शासन निर्णय

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ 4 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून,  याबाबतचा शासन निर्णय दिनांक 20 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील गटप्रवर्तक यांच्या मानधनाचा 4 हजार रुपयांची भरीव वाढ

NHM GR

दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

  1. "गट प्रवर्तक" यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ७२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ४०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. 
  2. उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ एप्रिल, २०२४ या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
  3. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु.१७.५९ कोटी इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतुद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली.
  4. सदर योजना सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात दिनांक ०१/०४/२०२४ पासून अंमलात येईल व त्यानुसार गटप्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक ०१/०४/२०२४ पासून २२१०१०१५ या लेखाशिर्षांतून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  5. सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक ०५/०९/२०२४ रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील '24' धडाकेबाज निर्णय!

तारीख ठरली! लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता

गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ 4 हजार रुपयांची वाढ, शासन निर्णय पाहा

राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करीत असतात. 

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना यापूर्वी राज्य शासनाच्या निधीतुन अनुक्रमे रु.५०००/- व रु.१০০০/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून रु.१०,०००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु.३०००/- असे एकुण रु.१३,०००/- इतके मानधन अदा करण्यात येते. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन मंजूर

सार्वजनिक आरोग्य विभाग : कुशल व अकुशल कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जारी

तसेच, गटप्रवर्तकांना राज्य शासनाच्या निधीतून रु.७२००/- व केंद्र शासनाच्या निधीतून रु.८७७५/- अशी एकुण रु.१५,९७५/- इतके मानधन अदा करण्यात येते. 

तसेच आशा स्वयंसेविकांना रु.५०००/- इतकी तर त्याचवेळी गटप्रवर्तकांना केवळ रु.१०००/- इतकी वाढ मंजूर करण्यात आली आहे. सदर वाढीमध्ये असलेल्या मोठ्या तफावतीमुळे गटप्रवर्तकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती. तसेच, सदर तफावत दुर करण्याबाबत वारंवार निवेदने प्राप्त झाले होते.

सद्यस्थितीत महागाईच्या निर्देशांकात होत असलेली वाढ तसेच, आरोग्य व पोषण यासंदर्भातील गटप्रवर्तकांची भुमिका व जबाबदारी विचारात घेवून गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 'सुपरहिट’, लाडक्या बहिणींना 30 सप्टेंबरपर्यंत येथे ऑनलाईन अर्ज करता येणार

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now