NHM Bharati : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत, पनवेल महानगरपालिकेकरिता विविध रिक्त असलेल्या पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
या पदभरती प्रक्रियेद्वारे इच्छुक व पात्र उमेदवारांच्या नेमणुका पनवेल महानगरपालिका यांच्या स्तरावरून गठीत केलेल्या समितीमार्फत थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत. यासाठी बुधवार दि.०४.०९.२०२४ रोजी दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेमध्ये थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. (जाहिरात PDF लिंक खाली दिलेली आहे)
लाडका भाऊ योजनेत 1.10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड; जुलै आणि ऑगस्टचे पैसे या तारखेला जमा होणार
सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना येथे पाहा
थेट मुलाखतीद्वारे निवड होणार
या निवड प्रक्रियेसाठी शासकीय नियमानुसार खालील पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- सदर पदभरती करीता पात्र होणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पनवेल महानगरपालिका स्तरावरील निवड समितीमार्फत घेण्यात येईल.
- मुलाखतीद्वारे निवड करावयाची असल्यास मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि.१७/०३/२०२२ रोजीच्या पत्रानुसार निकष लावून १:३ व १:५ उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.
जाहिरातीमध्ये दर्शविल्याप्रमाणे सदर पदे ही कंत्राटी स्वरूपात करार पध्दतीने मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर पदांसाठी अर्जाचा विहित नमुना पनवेल महानगरपालिकेच्या या www.panvelcorporation.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.