Mukhyamantri Yojana Doot Online Apply : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यात ५० हजार योजनादुतांची निवड करून त्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री योजनादूत - आवश्यक पात्रता
- वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
- शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
- उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक.
- उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
- उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
मुख्यमंत्री योजनादूत - आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज
- आधारकार्ड,
- पासपोर्ट साईज फोटो,
- पदवी प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह)
- वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल
- उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा,
- हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
मुख्यमंत्री योजनादूत - उमेदवार नोंदणी
- योजनादूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा.
- पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
- नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि OTP पाठवलेल्या फोनची पडताळणी करा.
- सत्यापनानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि ईमेलवर पाठवलेला OTP सत्यापित करा.
- तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल. प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आयडी वापरावा लागेल.
- तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करा.
- रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील. तुम्ही ते फिल्टर करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री योजनादूत - ऑनलाईन अर्ज येथे करा
सदरची कागदपत्रे नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दिनांक १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना https://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
लाडका भाऊ योजनेसाठी येथे ऑनलाईन अर्ज करा
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं करायचं? येथे पाहा स्टेप बाय स्टेप माहिती
मुख्यमंत्री योजनादूत - फायदे
- प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
- सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी.
- विद्यावेतनातून युवकांना आर्थिक साहाय्य.
- शिकण्याबरोबरच कौशल्य विकास.
- सरकारी कामकाजाचा अनुभव.
राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची निवड होणार (कामाचे स्वरूप)
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.