Mukhyamantri Vayoshri Yojana : ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Mukhyamantri Vayoshri Yojana : राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुक्रमे मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना  या दोन महत्त्वकांक्षी योजना राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

Mukhyamantri Vayoshri Yojana

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे रू.3000 च्या मर्यादेत खरेदी करता येतील.

उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय 

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; निधी बाबतचा शासन निर्णय

मुख्यमंत्री वयोश्री योजना - योजनेच्या अटी

ह्या योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती हे राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.31.12.2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केली असतील)

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’साठी अर्ज सुरू, येथे करा अर्ज; सविस्तर तपशील जाणून घ्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - अपडेट

मुख्यमंत्री वयोश्री योजना - उत्पन्न मर्यादा

  • लाभार्थ्यांचे कौंटुंबिक वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहिल,
  • सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे,
  • याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोणापत्र सादर करणे आवश्यक राहिल,
  • पात्र लाथार्थ्याने बँकेच्या खात्यात रुपये 3 हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड,
  • मतदान कार्ड,
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स,
  • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो,
  • स्वयंघोषणापत्र (उत्पन्नाचे व उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसल्याचे),
  • शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी येथे अर्ज सादर करा

‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now