आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई-संदेशाद्वारे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा राज्यस्तरीय ई- शुभारंभ पार पडला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा कोल्हापुरातून राज्यस्तरीय ई – शुभारंभ
कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल गाडी रवाना झाली. ८०० तीर्थयात्री दर्शनासाठी विशेष गाडीने मार्गस्थ झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे शुभेच्छा संदेशाद्वारे म्हणाले की, या योजनेचा शुभारंभ दक्षिण काशी आई अंबाबाईच्या करवीर येथून होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. त्यांनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन सामाजिक क्रांतिचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांनाही विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली विशेष गाडी आयोध्येसाठी रवाना होते आहे. प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्याचं संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे दक्षिण काशी कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी आयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’साठी अर्ज सुरू, येथे करा अर्ज; सविस्तर तपशील जाणून घ्या
‘मुख्यमंत्री योजनादूत’ : अर्ज करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. निवड झालेल्या लाभार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन खर्च करण्यात येणार आहे. भारतातील 73 आणि आपल्या राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश असून पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यांने या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या शुभारंभाचा मान पटकावल्याचे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ यांचे या शुभारंभाच्या निमित्ताने अभिनंदन केले.
देशातील महत्त्वाच्या 139 तीर्थक्षेत्रांची यादी पाहा
तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषधे, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे १०, वैद्यकिय मतदतीसाठी ३ तर आयआरसीटीसीचे २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोल्हापुरातून सुरु झालेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून अमंलबजावणी सुरु होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कंत्राटी कर्मचारी प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून शासन सेवेत कायम -शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात अपडेट
लाडक्या बहीण योजनेचा 3 रा हप्ता; याच महिलांना मिळणार लाभ!
कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासंदर्भात
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या सानुग्रह अनुदान बाबत शासन निर्णय पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा जीआर येथे पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!