Mukhyamantri Annapurna Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती, या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना । Mukhyamantri Annapurna Yojana
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Retil) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना "मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना" या नावाने राबविण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत (Free Gas Cylinder 2024)
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ८३० रुपये प्रती सिलिंडर अनुदान
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनामार्फत ५३० रुपये प्रती सिलिंडर अनुदान
- थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत बँक खात्यात थेट जमा होणार अनुदान
- लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक
- एका कुटुंबात (रेशन कार्ड नुसार) केवळ एक महिला लाभार्थी योजनेस पात्र
- केवळ घरगुती गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना योजना अनुज्ञेय एका महिन्यात फक्त एका सिलिंडर साठी अनुदान देण्यात येणार
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी, दि.०१ जुलै, २०२४ पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅसजोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅसजोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील ५२.१६ लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट!
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी येथे लिंक करा
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना - आवश्यक पात्रता
- सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
- सद्यःस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेस पात्र असेल.
- एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.
- सदर लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल.
राज्यातील महिला, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
अधिकृत वेबसाईट : https://www.pmuy.gov.in/