MSRTC : राज्यातील महिला, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!

MSRTC : एसटीने प्रवास करणाऱ्या महिला तसेच दिव्यांग प्रवशासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्वाचा निर्णय घेतला असून, त्यात महिलांसाठी एस टी तिकीटात 50 टक्के सवलत आणि 75 वर्षावरील जेष्टांसाठी मोफत प्रवास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, आता नुकतेच महामंडळाने काढलेल्या परिपत्रकानुसार महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आसन क्रमांक आणि तक्ता जाहीर केला आहे.

राज्यातील महिला, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!

MSRTC

महिला आणि दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये महिला तसेच दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. 

दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर साठी सविस्तर तपशील पाहा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 'हे' महत्वाचे परिपत्रक सोबत ठेवा!

साध्या बसेस पासून शिवनेरी बस मध्ये आरक्षित आसन क्रमांक जाहीर

साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत महिला आणि दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एस टी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. 

दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आसन क्रमांक

msrtc divyang seat no

दिव्यांग आणि महिलांसाठी आरक्षित आसन क्रमांक

msrtc divyang mahila seat no
msrtc divyang jeshtha mahila seat no

ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करित नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल. (UDID Card ग्राह्य धारणेबाबत येथे पाहा)

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय पाहा

मुख्यमंत्री योजनादूत 50000 जागांसाठी अर्ज सुरू

याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ- उतार करताना प्राधान्य दयावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आलेली आहेत.

अधिक माहितीसाठी : एसटी महामंडळाचे परिपत्रक पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now