MSEB Contract Workers : वीज कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी गणेशोत्सवाची खास भेट दिली आहे. या कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ करण्यात आली असून कामगारांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे. कामगारांनी काही ठिकाणी गुलाल उधळून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
कंत्राटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ; अनेक मागण्या मान्य
तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे हित लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अतिशय स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.
मार्च २०२४ पासून तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात १९ टक्के घसघशीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कामगारांचे वेतन इतर राज्यातील कामगारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
विशेष म्हणजे, या कंत्राटी कामगारांना देण्यात आलेली वेतनवाढ ही मार्च 2024 पासून देण्यात येणार आहे.
कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा
राज्यातील करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय
आरोग्यासाठी महात्मा फुले जनारोग्य योजनेत 'टॉप अप'
विशेष म्हणजे पहिली पगारवाढ सुद्धा मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झाली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जनारोग्य योजनेत 'टॉप अप' करून वेगळी योजना तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित. धनंजय मुंडे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
यासोबतच महानिर्मिती कंत्राटी कामगारांच्या इतर अनेक मागण्यांची दखल घेत सरकारने त्यादेखील मागण्या मान्य केल्या आहेत.
एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात (६५००) रुपयांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 'हे' महत्वाचे परिपत्रक सोबत ठेवा!
वीज कंत्राटी कामगारांच्या मान्य झालेल्या मागण्या
- महानिर्मिती कंपनीतील तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19 टक्के पगार वाढ
- मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मिती मधील सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार, नोकरीमध्ये सुरक्षेची हमी, कोणत्याही कंत्राटी कामगारांना काढणार नाही असे परिपत्रक देण्याची मागणी मान्य
- महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना वैद्यकीय लाभ मिळण्यासाठी मेडिक्लेम योजना सुरू करावी.
- महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येकी पाच वर्षासाठी पाच गुण असे 25 गुण अतिरिक्त देण्यात यावे व 45 वर्षाची वयोमर्यादा करण्यात यावी.
- महानिर्मिती कंपनीचा लोगो नवीन पद्धतीनं व जुन्या पद्धतीचा गेट पास सुरू ठेवावा, आणि कॉन्ट्रॅक्टरने नमूद केलेल्या गेटपास रद्द करण्यात यावा.
कंत्राटी भरतीचा तो शासन निर्णय काय आहे? येथे पाहा
राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय पाहा
महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना कृती समितीच्या आंदोलनाला यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत सह्याद्री अतिगृह येथे झालेल्या बैठकीत कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या मागण्या प्रलंबित होत्या. सरकारच्या या निर्णयामुळे महानिर्मिती कंत्राटी कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.