Mazhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली असून याबाबतच्या सुधारित सूचना महिला व बाल विकास विभागाने जारी केलेल्या दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
माझी लाडकी बहीण योजनेस अर्ज करण्यास मुदतवाढ
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास दि.०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 'हे' महत्वाचे परिपत्रक सोबत ठेवा!
अंगणवाडी आणि मदतनीस यांच्यासंदर्भात लेटेस्ट अपडेट पाहा
माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज यापुढे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच स्वीकारले जाणार
दिनांक 6 सप्टेंबर पासून आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदरचा निर्णय दि.०५.०९.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी येथे लिंक करा
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना - दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा
राज्यातील महिला, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!
‘मुख्यमंत्री योजनादूत’ अंतर्गत तब्बल 50 हजार उमेदवारांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरू - डायरेक्ट लिंक
या प्राधिकृत कर्मचाऱ्यांचे अर्ज स्विकारण्याचे अधिकार रद्द
या योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, "समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)", मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता दिनांक 6 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी अपडेट पाहा
10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
लाडका भाऊ योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार, लगेच करून घ्या हे काम