उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना सुरुच राहील – मुख्यमंत्री
राष्ट्रपतींच्या जीवनातील संघर्ष हा सर्वसामान्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज त्या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत. या ठिकाणी उपस्थित महिलांना राष्ट्रपती महोदयांच्या यशाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात '2' महत्वाचे अपडेट
गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार
माता भगिनींचा आशिर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्कम वाढविली जाणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशिर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्क्कम वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण’ योजनेसाठी मुदतवाढ! ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी येथे लिंक करा
बालसंगोपन योजनेचा फॉर्म व सविस्तर माहिती येथे पाहा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे अग्रेसर असून, अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत कायम आघाडीचे राज्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील एक संघर्षशील महिला आपल्यापुढे राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत. तर मागास वर्गीयाचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
मोठा निर्णय! मुलींना लखपती करणारी लेक लाडकी योजना राज्यात लागू