Maha Teacher Recruitment News : स्थानिक स्वराज संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर २१,६७८ रिक्त पदांसाठी एकूण १९,९८६ पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याच्या बातमीबद्दल शिक्षण विभागाने खुलासा केला आहे.
शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी
शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन पत्र दिनांक २५/०१/२०२४ अन्वये निर्देश आहेत. तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनस्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी सबंधित तज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले आहेत.
सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये यादृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET Exam) ऑनलाईन अर्ज सुरू, डायरेक्ट लिंक
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ - शासन निर्णय
शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
परीक्षा केवळ या उमेदवारांपुरतीच मर्यादित
या संदर्भात दिनांक ३०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोट द्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत.
त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण १२८८ उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टल मार्फत शिफारस झाली आहे. एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे.
राज्यातील हे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 'सुपरहिट’, पाहा अपडेट
‘मुख्यमंत्री योजनादूत’ : अर्ज करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
शिक्षण विभागाचा मोठा खुलासा!
पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यता धारकांचा काहीही संबंध नाही असे असतानाही वस्तुस्थितीची कोणतीही खातरजमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे, काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे.
साधनव्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटीन द्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल.
शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना, बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेस नोट द्वारे अथवा वार्तालापाद्वारे दिल्या जातात, त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन मा मंत्री (शिक्षण) यांनी केलेले आहे.
अधिकृत वेबसाईट : https://mahateacherrecruitment.org.in/