लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 'हे' महत्वाचे परिपत्रक सोबत ठेवा!

Ladki Bahin Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना १५०० रूपये दिले जात आहे. दिनांक ८ सप्टेंबर पर्यंत १ कोटी ५९ लाख महिलांना लाभ देण्यात आला असून ४ हजार ७८७ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. मात्र काही महिलांच्या खात्यातून पैसे कपात झाल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्याने, राज्य शासनाच्या मार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (सर्व) (मुंबई वगळून) यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्यात आहे. सविस्तर वाचा (परिपत्रक लिंक खाली दिलेली आहे)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 'हे' महत्वाचे परिपत्रक सोबत ठेवा!

Ladki Bahin Latest Update

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभ हे माहे जुलै, २०२४ व माहे ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु.३००० इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न (Aadhar Seeded) बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने (DBT) जमा करण्यात आला आहे. 

तसेच दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात देखील थेट लाभ जमा करण्यात आला असून, आता सप्टेंबर मध्ये देखील अर्ज सुरू आहेत.

तारीख ठरली! लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता 

सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (सर्व) (मुंबई वगळून) यांना महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत. 

दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर साठी सविस्तर तपशील पाहा

मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री, असा करा ऑनलाईन अर्ज

  1. "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. 
  2. सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
  3. काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बँकाना सूचना - परिपत्रक पाहा

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट! 

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय पाहा

मुख्यमंत्री योजनादूत 50000 जागांसाठी अर्ज सुरू

राज्यातील महिला, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now