ग्रामविकास विभागाचे ‘दोन’ महत्वाचे शासन निर्णय निर्गमित

राज्य शासनाने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामविकास विभागाचे दोन महत्वाचे निर्णय घेतले असून, याबाबतचे शासन निर्णय दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

$ads={1}

ग्रामविकास विभागाचे ‘दोन’ महत्वाचे शासन निर्णय निर्गमित

gramvikas vibhag gr

त्यानुसार ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ (२५५००-८११००) या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिदान "ग्रामपंचायत अधिकारी" असे करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१४ (३८६००-१२२८००), २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहायक गट विकास अधिकारी एस-१५ (४१८००-१३२३००) व ३० वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस-२० (५६१००-१७७५००) असा अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय)

मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी हे महत्वाचे निर्णय

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

2) राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. 

तर उपसरपंचांना 2 हजार, 3 हजार आणि 4 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. सध्या सरपंचांना 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना 1 हजार, दिड हजार आणि 2 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळते. राज्यात 27 हजार 943 ग्रामपंचायती आहेत. (शासन निर्णय)

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल

माझी लाडकी बहीण महत्वाची अपडेट

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now