Free Education For Girl In Maharashtra : आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
राज्यातील या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क माफ
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे/विहित पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते.
राज्यातील या मुले व मुली यांना १०० टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क माफ
आतापर्यंत आरोग्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना (मुले व मुली) शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु, आता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्य सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी!
लाडका भाऊ योजनेअंतर्गत 1.10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड; अर्ज येथे करा
शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना
आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांस प्रवेश देताना, त्यांच्याकडून शिक्षण शुल्क न आकारण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना/संस्थांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
- सक्षम प्राधिका-यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे आरोग्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांस प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनीना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा,
- ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा,
- शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन, संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे,
- आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकटष्ट्वा दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम १००% परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचेकडे करावा,
- वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत परीक्षा शुल्काची योजनेप्रमाणे अनुज्ञेय असलेली रक्कम योजनेंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बैंक खात्यात बेट जमा करावी. तसेच, शिक्षण शुल्काची अनुज्ञेय रक्कम संस्थेच्या/महाविद्यालयाच्या बैंक खात्यात थेट जमा करावी.
- प्रवेशाच्यावेळी संस्थांनी विद्याभ्यांकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास, सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत 1.10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड; अर्ज येथे करा
वरील सूचना आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, मुंबई यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व शिक्षण संस्थांच्या तसेच, विद्यापीठांच्या निदर्शनास आणून, त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन परिपत्रक पाहा
मोठा निर्णय! मुलींना लखपती करणारी लेक लाडकी योजना राज्यात लागू