मोठी बातमी : सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; राज्य सरकारचा निर्णय!

Eid-e-Milad Public Holiday : सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी बाबत सामान्य प्रशासन विभागाने एक महत्वाची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात आली आहे.

सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; राज्य सरकारचा निर्णय

Eid-e-Milad Public Holiday

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. 

ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोनी समाजामध्ये शांतता व सामानिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ!

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी!

इतर जिल्ह्यातील सुट्टी बाबतचा निर्णय काय आहे?

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकान्यांनी निर्णय घ्यावा अशा स्पष्ट सूचना अधिसूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी : अधिसूचना पाहा

कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

विधानसभा निवडणूक; महत्वाची बैठक संपन्न

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now