मोठी बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ! या तारखेपासून मिळणार वाढीव मानधन

Data Entry Operators Salary Increase : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या मानधन तत्वावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात 4350 रुपयांची दरमहा वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ!

Data Entry Operators Salary Increase

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर डाटा एन्ट्री ऑपरेटर्स कार्यरत आहेत. सदर डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांना दि.०१ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु.२०,६५०/- प्रती माह इतके मानधन देण्यात येत आहे. आता यामध्ये 4350 दरमहा वाढ करण्यात आली असून, सुधारित मानधनानुसार दरमहा रु.२५,०००/- इतके करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

किमान वेतन अधिनियमानुसार मानधन वाढ 

शालेय शिक्षण विभागाच्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन तसेच, किमान वेतन अधिनियम, १९४८ नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

शासन सेवेत नियमित होण्यासाठी परीक्षा बंधनकारक? शिक्षण विभागाचा मोठा खुलासा

कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांना वाढीव मानधन या तारखेपासून मिळणार

राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन दरमहा रु.२५,०००/- इतके करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर मानधन वाढ दि.०१ सप्टेंबर, २०२४ पासून लागू असणार आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

राज्यातील हे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश येथे पाहा

मानधन थेट 10 हजारावरून 50000 करण्याचा निर्णय! एक विशेष बाब म्हणून मंजूरी; शासन निर्णय

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now