समग्र शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत १७७५ विशेष शिक्षकांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना वितरीत करण्यास दिनांक २५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
$ads={1}
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय
समग्र शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत विशेष शिक्षकांना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात रु.२१,५००/- प्रतिमाह इतके मानधन मंजूर होते. समग्र शिक्षा अभियानाच्या सुधारित आराखड्यानुसार सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून प्रति शिक्षक प्रति माह रु.२०,०००/- इतके मानधन निश्चित करण्यात आले आहे.
त्यामुळे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत विशेष शिक्षकांना रु.२१,५००/- प्रति माह याप्रमाणे मानधन मंजूर करण्यास तसेच प्रति शिक्षक रु.१५००/- प्रतिमाह फरकाची रक्कम राज्य निधीमधून अदा करण्यासाठी रु.३५०.२८ लक्ष इतका निधी दरवर्षी राज्य हिश्श्याच्या प्रमाणाबाहेर उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास विभागाच्या दि.०२.०८.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
गुड न्यूज! कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय!
त्यानुसार आता समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी रु.३,१९,५०,०००/- इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)
सरकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे शासन निर्णय
गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता
राज्यातील हे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ!
राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल