Contractual Employees Regular : शिर्डी येथे झालेल्या मुख्यमंत्री-महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कि, शिर्डी संस्थानामधीन ५८४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे, तसेच पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
$ads={1}
एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा; 'या' लाखो भगिनींना मिळतोय लाभ!
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.
लाडक्या बहीण योजनेच्या या महिलांच्या खात्यात इतके रुपये जमा होणार
महिलांना एसटी बसमध्ये पन्नास टक्के तिकिट सवलत देण्यात आली. यामुळे तोट्यात आलेली एसटी फायद्यात आली. शासन महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलपणे काम करित आहे. मुलींच्या शिक्षणासाठी ५०६ महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुलींना शिकविले पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील 'हे' कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम; उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय होणार
शिर्डी संस्थानामधीन ५८४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. शिर्डी नवीन विमानतळांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, शिर्डीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख बहींणींनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. यातील अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मुलींचे शिक्षण मोफत करण्यात आले. शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्यात आले. शिर्डी संस्थानामधील ५८४ कर्मचाऱ्यांना शासकीयसेवेत कायम करण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचारी प्रथम नियुक्ती दिनांक पासून शासन सेवेत कायम; महत्वपूर्ण निर्णय
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात अपडेट येथे पाहा
लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता; या महिलांना
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? चेक करा
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
कंत्राटी विभागस्तर, जिल्हास्तर, व तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ
गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता
‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता