सार्वजनिक आरोग्य विभाग : कुशल व अकुशल कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जारी

राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल २६०३ मनुष्यबळाची निर्मिती ९३ विविध आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आली आहे. आता या मनुष्यबळासाठी येणाऱ्या वार्षिक खर्चास किमान वेतन कायदयानुसार अनुज्ञेय असलेली वाढ देण्याचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग : कुशल व अकुशल कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जारी

contract-recruitment-aarogya-gr

राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रशासानावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासकिय विभागाने शक्य असेल तिथे पदनिर्मिती न करता संबंधित कामे बाह्ययंत्रणेकडून करावयाची आहेत. त्यामुळे काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे बाह्ययंत्रणेव्दारे कंत्राटी स्वरुपात भरण्याकरीता होणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

मानधन थेट 10 हजारावरून 50000 करण्याचा निर्णय! एक विशेष बाब म्हणून मंजूरी; शासन निर्णय

परिचारिका आशा बावणे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सदर मनुष्यबळासाठी येणाऱ्या वार्षिक रु.५९.८७,३३,००४/- इतक्या खर्चास (सदरची मूळ रक्कम असून किमान वेतन कायदयानुसार अनुज्ञेय असलेली वाढ सेवाशुल्क जीएसटी इत्यादी याव्यतिरीक्त राहतील) ३ वर्षाकरीता (सन २०२४-२५, २०२५-२६, २०२६-१७) प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचा-यांची जिल्हानिहाय सेवा जेष्ठता यादी येथे पाहा

माझी लाडकी बहीण योजना - अंगणवाडी सेविका व मदतनीस

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान - शासन निर्णय पाहा

अटी व शर्ती

सदर पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याकरीता खालील अटींच्या अधीन राहील.

  • सदर काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे भरण्यासाठी केवळ सेवाशुल्काच्या निविदा पध्दतीने अथवा उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय दिनांक १८.०६.२०१४ अनुसार सेवापुरवठादार निश्चित करण्यात यावा.
  • वर नमूद संस्थाबाबतच्या विभागाच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदनामनिहाय मासिक ठोक वेतनावर भरण्यात यावी.
  • बाह्ययंत्रणेव्दारे मनुष्यबळ भरणा करताना शासन परिपत्रक, वित्त विभाग दिनांक. १७.०४.२०१५. दिनांक. ०२.०२.२०१३ व दिनांक ०२.१२.२०१३ मधील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे.
  • सदर ९३ आरोग्य संस्थांमधील २६०३ काल्पनिक कुशल व अकुशल मनुष्यबळ भरणा करण्याची कार्यवाही आयुक्त, आरोग्य सेवा यांनी निश्चित करावी, असे शासन निर्णयात नमूद आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा

कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय पाहा

दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर साठी सविस्तर तपशील पाहा

राज्यातील गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा निर्णय येथे पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now