राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल कृतज्ञता सोहळा संपन्न

राज्य शासनाने कंत्राटी कामगारांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळा व कामगार मेळावा नुकताच संपन्न झाला, या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील,असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल कृतज्ञता सोहळा संपन्न

राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील '24' धडाकेबाज निर्णय!

तासिका तत्त्वावरील निदेशकांना विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ! या तारखेपासून मिळणार वाढीव मानधन

गुड न्यूज! कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय!

वीज कंत्राटी कामगारांच्या मान्य झालेल्या मागण्या

  1. महानिर्मिती कंपनीतील तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19 टक्के पगार वाढ
  2. मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मिती मधील सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार, नोकरीमध्ये सुरक्षेची हमी, कोणत्याही कंत्राटी कामगारांना काढणार नाही असे परिपत्रक देण्याची मागणी मान्य
  3. महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना वैद्यकीय लाभ मिळण्यासाठी मेडिक्लेम योजना सुरू करावी.
  4. महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येकी पाच वर्षासाठी पाच गुण असे 25 गुण अतिरिक्त देण्यात यावे व 45 वर्षाची वयोमर्यादा करण्यात यावी.
  5. महानिर्मिती कंपनीचा लोगो नवीन पद्धतीनं व जुन्या पद्धतीचा गेट पास सुरू ठेवावा, आणि कॉन्ट्रॅक्टरने नमूद केलेल्या गेटपास रद्द करण्यात यावा.
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now