गुड न्यूज! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, कंत्राटी संसाधन व्यक्तीचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय जारी

Contract Employees Salary Increase : राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन व स्वयंसहाय्यता गट यांना देण्यात येणारा वाढीव फिरता निधी अखेर वितरीत करण्यात आला आहे, तसा शासन निर्णय दिनांक 19 सप्टेंबर रोजी निर्गमित झाला आहे.

$ads={1}

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, कंत्राटी संसाधन व्यक्तीचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय जारी

Contract Employees Salary Increase

संभाजीनगर येथील दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल रु.६०००/- दरमहा मानधन अदा करण्याबाबत तसेच उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्यः स्थितीत "अ", "ब" व "क" वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी (Revolving Fund) वितरीत करण्यात येतो. 

आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट!

मोठी बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ 4 हजार रुपयांची वाढ, शासन निर्णय

यामध्ये वाढ करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करुन "अ" वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयं सहाय्यता गटांना रु.३०,०००/- व वर्गवारी "ब" व "क" मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी (Revolving Fund) अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा जीआर येथे पाहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

सन २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींसाठी वाढीव मानधन व स्वंय सहायता गटांना फिरता निधी (अतिरिक्त राज्य हिस्सा) (२५०१ए१८२) याकरिता केलेल्या तरतूदीतून रु.८१६७.९२ लक्ष (रुपये एक्याऐंशी कोटी सदुसष्ठ लाख ब्यान्नव हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.D.S) द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात आला आहे. 

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

शिक्षक पात्रता (CTET) आणि (TET) ऑनलाईन अर्ज सुरू, डायरेक्ट लिंक

पीएमपीएमएल चे 1748 बदली कर्मचारी सेवेत कायम

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now