Contract Employees Regularization : मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, (MAT) मुंबई यांच्या निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून सेवाविषयक लाभांसाठी (आर्थिक लाभ वगळून) नियमित करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला असून, दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय!
आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण या योजनेस कायमस्वरुपी मान्यता देण्यात आली, तसेच या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर पदांना व त्यापैकी सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या १६२ कर्मचाऱ्यांची सेवा दि. ०१/०४/२०१४ पासून नियमित करुन कायमस्वरुपी सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. सदरचा निर्णय हा दि. २३/०२/२०१४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, त्यानुसार दिनांक 8 जुलै 2014 च्या शासन निर्णयानुसार सदर कार्यवाही करण्यात आली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात अपडेट
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून मिळणार सेवाविषयक लाभ
मात्र यातील काही कर्मचाऱ्यांनी कंत्राटी स्वरुपातील सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून कायम धरुन सेवा विषयक लाभ (आर्थिक लाभ वगळून) मिळण्याकरीता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) मुंबई येथे अर्ज दाखल केला होता, त्यानुसार मा. न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली आहे.
मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व मा. उच्च न्यायालय यांचे न्यायनिर्णय विचारात घेऊन राज्य शासनाने आता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील "आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या योजनेंतर्गत १६२ नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांच्या निर्णयानुसार कंत्राटी स्वरुपातील सेवेच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून सेवाविषयक लाभांसाठी (आर्थिक लाभ वगळून) नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ शासन निर्णय
राज्यातील 'हे' कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम; उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय होणार
कंत्राटी स्वरुपातील सेवा पुढील अटी व शर्तीनुसार नियमित
त्यानुसार कंत्राटी स्वरुपातील सेवा पुढील अटी व शर्तीनुसार नियमित करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.
- सदर १६२ कर्मचाऱ्यांच्या सेवा त्यांच्या कंत्राटी स्वरुपातील प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित करण्यात येत आहे.
- सदर १६२ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत केलेली कार्यवाही भविष्यात पुर्वाधारण ठरणार नाही.
- सदर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा नियमित केलेल्या दिनांकापासून सर्व सेवा विषयक लाभ मंजूर करण्यात येत आहेत. तथापि, त्यांना याबाबतचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ (monetary benefits) अनुज्ञेय राहणार नाहीत.
- सदर कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी स्वरुपातील सेवेची माहितीची खातरजमा करुन सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची राहील. (शासन निर्णय)
लाडक्या बहीण योजनेचा 3 रा हप्ता; याच महिलांना मिळणार लाभ!
कंत्राटी विभागस्तर, जिल्हास्तर, व तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ
कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासंदर्भात
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या सानुग्रह अनुदान बाबत शासन निर्णय पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा जीआर येथे पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!