आनंदाची बातमी! या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

Contract Employees Regularisation : राज्यातील श्रीसाईबाबा संस्थान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (Contract Employees) शासकीय सेवेत कायम करून घेण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला, त्यानुसार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या कर्मचाऱ्यांना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

Contract Employees Regularisation

साईबाबा संस्थान मधील सुमारे ५९८ कर्मचारी आणि आउटसोर्सिंग मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्यातआले. संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने सरकारात्मक अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या ऐतिहासिक निर्णयाचे नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी शासन सेवेत कायम व्हावे, यासाठी पाठपुरावा करत होते. शिवाय दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा संघर्षही मोठा झाला. अशा सर्व परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचा शब्द राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. त्याची वचनपूर्ती या निर्णयाने करता आल्याचे मला समाधान वाटत आहे. असे यावेळी ते म्हणाले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश येथे पाहा

शासन सेवेत नियमित होण्यासाठी परीक्षा बंधनकारक? शिक्षण विभागाचा मोठा खुलासा

राज्यातील हे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत

Contract Employees Regularisation

राज्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यासाठी शुक्रवारी (दि 18) ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार साईबाबा संस्थानचे कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापूर्वी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शासकीय सेवेमध्ये नियमित करण्यात आले आहे. याच धर्तीवर आता इतर उर्वरित कंत्राटी कामगारांना तसेच कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी पाठवलेला आहे. 

त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतच्या आवश्यक प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मा. मंत्री श्री विखे पाटील यांनी विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

मानधन थेट 10 हजारावरून 50000 करण्याचा निर्णय! एक विशेष बाब म्हणून मंजूरी; शासन निर्णय

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक

नियुक्ती पत्र देण्याच्या कार्यक्रमास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्षनाथ गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलहूले, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर, डॉ. सुजय विखे पाटील, सभापती श्री. ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष श्री. कैलास कोते, श्री. अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.कमलाकर कोते, कामगारांच्या पतसंस्थेचे चेअरमन श्री. तुकाराम पवार यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश येथे पाहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ! या तारखेपासून मिळणार वाढीव मानधन

विधानसभा निवडणूक; महत्वाची बैठक संपन्न

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now