Contract Employees Order : राज्यातील श्रीसाईबाबा संस्थान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (Contract Employees) शासकीय सेवेत कायम करून घेण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला.
साईबाबा संस्थान मधील सुमारे ५९८ कर्मचारी आणि आउटसोर्सिंग मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्यातआले. संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने सरकारात्मक अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या ऐतिहासिक निर्णयाचे नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या कर्मचाऱ्यांना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी शासन सेवेत कायम व्हावे, यासाठी पाठपुरावा करत होते. शिवाय दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा संघर्षही मोठा झाला. अशा सर्व परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचा शब्द राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. त्याची वचनपूर्ती या निर्णयाने करता आल्याचे मला समाधान वाटत आहे. असे यावेळी ते म्हणाले.
राज्यातील हे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ! या तारखेपासून मिळणार वाढीव मानधन
विधानसभा निवडणूक; महत्वाची बैठक संपन्न
‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी!
सार्वजनिक आरोग्य विभाग : कुशल व अकुशल कंत्राटी भरतीचा शासन निर्णय