राज्य सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ | Caste Validity Certificate submission Extension

Caste Validity Certificate submission Extension : सन २०२४-२५ या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर  करण्यास 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

SEBC प्रवर्गाप्रमाणेच OBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता मुदतवाढ

Caste Validity Certificate submission Extension

राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत. याबाबत  विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, डिग्री (इंजीनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

लाडका भाऊ योजनेसाठी येथे अर्ज करा

‘मुख्यमंत्री योजनादूत’ अंतर्गत तब्बल 50 हजार उमेदवारांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरू - डायरेक्ट लिंक

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) प्रवर्गाप्रमाणेच इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गातील उमेदवारांकरिता ही मुदत देण्यात आली आहे.

लाडका भाऊ योजनेअंतर्गत 1.10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड; अर्ज येथे करा

शिक्षण शुल्क न घेण्याबाबत - शासन परिपत्रक

अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी

सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता, प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे.  सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहतील. याबाबतचा  शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात '2' महत्वाचे अपडेट

राज्यातील 36 हजार 978 अंगणवाडी केंद्रांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

बीएड (विशेष शिक्षण) YCMOU ऑनलाईन अर्ज येथे करा

आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now