Anganwadi Sevika : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त भगिनींपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींचा सत्कार समारंभ दिनांक 10 सप्टेंबर रोजी येवला शहरात पार पडला. या कार्यक्रमात 11 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान केला. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित भगिनींशी संवाद साधत शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे काम आदर्शवत असल्याची भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच करता येणार
राज्यातील महिलांना सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे अधिकार यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून प्रत्येक अर्जामागे 50 रूपये मानधन देण्यात येत आहे.
दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत येवला तालुक्यातील १ लाख ८ हजार ६३ महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे श्रेय अंगणवाडी सेविकांना जाते. गोरगरीबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिली आहे. या संधीचं सोनं या भगिनींनी करावं, असं आवाहन मा. मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.
दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर साठी सविस्तर तपशील पाहा
राज्यातील 36 हजार 978 अंगणवाडी केंद्रांसाठी सरकारचा मोठा निर्णय!
सार्वजनिक आरोग्य विभाग : कुशल व अकुशल कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जारी
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट!
अंगणवाडी सेविकांच्या कामाचे कौतुक
बालकांना पोषण आहार, प्राथमिक शिक्षण, आरोग्य विषय सुविधा, लसीकरण, कुपोषण रोखण्याचे महत्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. त्यांचं हे काम अतिशय महत्वाचं आहे. देशाचं भविष्य घडविण्याची जबाबदारी पालकांनंतर अंगणवाडी सेविका करतात. शिक्षणासोबतच आरोग्य, पोषण आहार, लसीकरण व शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कामाला तोड नाही, अशा शब्दात त्यांच्या कामाचे कौतुक केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट
मुख्यमंत्री योजनादूत 50000 जागांसाठी अर्ज सुरू
राज्यातील महिला, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ४६ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे. महिलांच्या खात्यातून पैसे कापणाऱ्या बँकावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यामुळे योजनेचे पूर्ण पैसे महिलांना मिळणार आहे. राज्यातील १५ लाख भगिनींना लखपती दीदी बनविण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती यावेळी दिली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल १९ टक्के वाढीसह इतर या मागण्या मान्य
राज्यातील करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, सदस्य पांडुरंग शेळके, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दत्ता निकम, राजश्री पहिलवान, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मुश्ताक शेख, अमजद शेख, अल्केश कासलीवाल, मलिक शेख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकज मगर, महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.