केंद्र शासनामार्फत देशातील 10 जिल्ह्यात पोषण इनोव्हेशन केंद्र सुरू केले जात असून त्यात महाराष्ट्रातून गडचिरोली जिल्ह्याची निवड झाली आहे, या केंद्राच्या माध्यमातून उल्लेखनिय कामगिरी करून दाखवत गडचिरोली जिल्हा गर्भवती व स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांच्या आरोग्य व पोषण क्षेत्रात महाराष्ट्रात दिशादर्शक ठरेल असा विश्वास महिला व बालविकास मंत्री यांनी व्यक्त केला आहे.
गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार
महिला व बालकांच्या आरोग्याच्या विकासाकरिता आघाडीवर काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे तांत्रिक कौशल्ये आणि क्षमता वाढीसाठी हे कौशल्य विकास केंद्र महत्वपूर्ण कार्य करेल. या केंद्रातून राज्यातील जास्तीत जास्त पर्यवेक्षीकांना प्राधाण्याने प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरून त्या इतर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनाही प्रशिक्षीत करतील. कुपोषण टाळण्यासाठी अंगणवाडी सेवीकांना योग्य मार्गदर्शन व कौशल्य विकासची गरज या केद्राच्या माध्यमातून पूर्ण होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.